कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कुडाळ आगाराला साडेपाच लाखाचे उत्पन्न

कुडाळ आगाराला साडेपाच लाखाचे उत्पन्न

मालवण

आंगणेवाडी येथील भराडी देवी यात्रोत्सवानिमित्त कुडाळ एसटी आगारातूनही जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. कुडाळ आगारामार्फत तालुक्यातील विविध गावांतून २७ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. जादा वाहतूकीच्या माध्यमातून कुडाळ आगाराकडून ८०१६ किमी चालवून त्यातून ५ लाख ६८ हजार ५७९ रुपये उत्पन्नातून ७०.९३ प्रती किमी उत्पन्न व ११६.१२ एवढे भारमान मिळाले. या यात्रेमध्ये विशेष बस सेवेकरिता ४ बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यातून उत्पादित ५१४ किमी व अनुत्पादित ६८६ किमी चालविण्यात आले. यातून ६६
हजार रुपये उत्पन्न मिळाले. प्रती किमी ५५ उत्पन्न व ९०.०४ एवढे भारमान मिळाले. भाविकांसाठी एकूण २३ रा. प. बसचा वापर करून ११० बसफेऱ्या सोडण्यात आल्या. यातून ५ लाख २ हजार ५७९ रुपये उत्पन्न कुडाळ आगारास प्राप्त झाले. प्रती किमी ७३.७३ एवढे उत्पन्न व १२०.७१ एवढे भारमान मिळाले. यात २७ चालक व २३ वाहक अशा एकूण ५० कर्मचारी सहभागी झाले होते. यात्रा विभाग नियंत्रक प्रशांत वासकर व विभागीय वाहतूक अधिकारी, विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या झाली. यात्रा यशस्वीतेसाठी चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!