सावंतवाडी सारख्या भागात शैक्षणिक संस्था उभे करणे सोपे काम नव्हते., अनेकांनी मला वेड्यात काढले -अच्यूत भोसले
सावंतवाडी सारख्या भागात शैक्षणिक संस्था उभे करणे सोपे काम नव्हते., अनेकांनी मला वेड्यात काढले -अच्यूत भोसले
अच्युत भोसले; लक्ष्मी व सरस्वती एकाच माणसाने नांदवली, विकास पाटलांकडून कौतुक…
सावंतवाडी,दि.०८: अनेक शैक्षणिक संस्था बंद पडत असताना मी सावंतवाडी भोसले नॉलेज सिटी सुरू करण्याच्या विचारात होतो. यावेळी अनेकांनी मला वेडात काढले, काहींनी मला चिडवले, शिक्षण संस्था काढणे हे आमदार खासदारांचे काम सर्वसामान्य माणूस काही करू शकत नाही, असे सांगितले. परंतू माजी आमदार के. पी. पाटील आणि त्यांचे सुपूत्र विकास पाटील यांच्या सहकार्यामुळेच मी माझ्या महाविद्यालयाचा प्रवास सुरू करू शकलो. सहकारातच दुसऱ्याला मोठे करण्याची ताकद आहे, असे मत भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्यूत भोसले यांनी व्यक्त केले. दरम्यान श्री. भोसले यांनी लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदवल्याचे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर दिसते. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या महाविद्यालयाचा आदर्श घेवून आमच्या भुदरगड येथिल महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे, असे गौरवोद्गार बाळुमामा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विकास पाटील यांनी काढले. सावंतवाडी भोसले नॉलेज सिटीच्या माध्यमातून पॉलिटेक्नीकलचे स्नेहसंमेलन आज साजरे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी भोसले यांनी विठ्ठलाची मुर्ती देवून माजी आमदार श्री. के. पी. पाटील यांचा सन्मान केला.
श्री. भोसले पुढे म्हणाले, या ठीकाणी मी नव्याने महाविद्यालय सुरू करण्याच्या विचारात होतो. त्यासाठी अनेक महाविद्यालये पाहणीसाठी फीरलो. यात भुदरगड येथिल महाविद्यालयाचा निटनेटकापणा मला आवडला. त्याच महाविद्यालया सारखे आपण महाविद्यालय उभारायचे हे डोळ्यासमोर ठेवून त्या संस्थेचे सचिव असलेले पाटील यांना मी भेटलो. यावेळी मी त्या ठीकाणी अल्टो घेवून गेलो होतो. माझ्याकडे पाहील्यानंतर श्री. पाटील यांना प्रश्न पडला असावा. त्यामुळे तुम्ही नक्की कोकणात कॉलेज सुरू करणार का ? तुम्हाला कसे जमणार ? असा त्यांनी प्रश्न केला. यावेळी माझे ते स्वप्न असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. मी आठ दिवसांनी अंतिम निर्णय घेवून त्यांना पुन्हा भेटायला गेलो. यावेळी माझी तळमळ पाहून त्यांनी आपल्या महाविद्यालयाचा गोपनिय अहवालच माझ्याकडे दिला. आणि तुम्हाला माहीती लागणार आहे त्यामुळे त्याची झेरॉक्स करा, आणि नंतर ते पुन्हा आम्हाला आणून द्या, असे सांगितले. त्याच्या त्या मदतीमुळे माझा पुढचा प्रवास सुखकर झाला. परंतू त्यांनी टाकलेला विश्वासामुळेच ही संस्था मी यशस्वीपणे उभी करू त्यामुळे त्यांचे योगदान कधीही न विसरता येणारे आहे. ही संस्था त्या ठीकाणी सहकारातील व्यक्ती असल्यामळेच उभी राहिली असेही ते म्हणाले.
या ठीकाणी माझ्या महाविद्यालयाची कागदपत्रे द्यायची वेळ आली असती तर मी शंभर वेळा विचार केला असता. परंतू त्यांनी मला कोणतीही काळजी न करता विश्वास ठेवून महत्वाची कागदपत्राची फाईल दिली. त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाहीत. त्यामुळे पाटील हे माझ्या कुंटूबातील सदस्य बनले.
यावेळी विकास पाटील यांनी ही भोसले नॉलेट सिटीसह भोसले यांचे कौतूक केले. या महाविद्यालयात दर्जेदार आणि चांगल्या सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण स्तरावर काम करीत असताना आम्हाला तुमची संस्था काम करण्याची प्रेरणा देईल, असे ही ते म्हणाले.

