कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

बंगला बांधून देतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी अजून एकावर गुन्हा दाखल.

बंगल्याच्या आमिषाने पैसे हडपप्रकरणी आणखी एक गुन्हा

कणकवली

जानवली येथे गृह प्रकल्पांतर्गत बंगला बांधून देण्याचे अमिष दाखवून सौ. शामल मंगेश तळदेवकर (४३, जानवली-डोंगरेवाडी) यांच्याकडून १२ लाख रुपये घेतले. त्यानंतर बंगला बांधून न झाल्याबाबत सदरची रक्कम परत देण्यास सांगूनही ती परत न दिल्याबाबत सेव्हन स्केअरफीट कन्स्ट्रक्शन एल. एल. पी. या फर्मचे भागीदार तेजेरस सागर घाडीगावकर (माजगाव मुंबई), एन्टॉन पिटग नऱ्हानो (वडाळा – मुंबई), विनोद गिरधर परमार (मुंबई), नीलेश विश्वनाथअवघडे (वडाळा – मुंबई) अशा चार जणांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी अशाचप्रकारे गोवा येथीलही उभयतांची दोन लाखांची फसवणूक केल्याचेही शामल तळदेवकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, संशयितांवर साधारण आठवड्यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल आहे. शामल यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना १९ जुलै २०२१ या दिवशी संशयितांनी जानवली- बौद्धवाडी येथे ‘अंबर’ नावाने लावलेले होर्डिंग दिसले. शामल यांनी सशयितांकडे विचारणा केली. संशयितांनी
नवीन बंगला बांधून देण्याविषयी सांगितले. तसेच त्यासाठी १२ लाख रुपये अॅडव्हान्स स्वरुपात द्यावे लागतील, असेही सांगितले. त्यानुसार शामल यांनी संशयितांकडे १२ लाख रुपये धनादेशाद्वारे दिले… मात्र, बंगल्याचे बांधकाम पुढील कित्येक दिवस सुरुच न झाल्याने शामल यांनी संशयितांकडे आपली रक्कम परत मागितली. मात्र, संशयितांनी ही रक्कम मागे केलेली नाही. तसेच ते सध्या फोनही उचलत नसल्याचे शामल यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याच संशयितांबाबत जानवली येथील साक्षी जयप्रकाश पाताडे यांनी साधारण दोन आठवड्यापूर्वी तक्रार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!