कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बिरोडकर टेंब रहिवाशांचा एकोपा दृष्ट लागावा असा -अच्यूत भोसले.

बिरोडकर टेंब रहिवाशांचा एकोपा दृष्ट लागावा असा -अच्यूत भोसले.

बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळ आयोजित बिरोडकर टेंब प्रियर लिग पर्व तिसरे चा बक्षीस वितरण कार्यक्रम

बिरोडकर टेंब रहिवाशांचा एकोपा पाहून मनाला आनंद वाटला, असा एकोपा कुठे पाहायला मिळत नाही तो आपण जोपासला आहे, तो असाच कायम टिकून ठेवावा,असे आवाहन भोसले नॉलेज सिटी चे संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले यांनी बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळ आयोजित बिरोडकर टेंब प्रीमियर लीग पर्व तिसरे च्या बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलताना केले.
गेली तीन वर्षे बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळ अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करुन हा एकोपा अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करीत आहे व तो प्रयत्न यशस्वी झाला आहे,असा एकोपा टीकवून ठेवणे हे मोठे काम आहे,ते बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळ पार पाडत आहे, विशेष म्हणजे तुमच्या या स्पर्धेला महिला भगिनींची साथ ही मोलाची आहे व हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे असे गौरवोद्गार काढले.

यावेळी मंडळाच्या वतीने भोसले नाॅलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन मंडळाचे जेष्ठ सल्लागार दिलीप म्हापसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे, खजिनदार विकी बिरोडकर, दिलीप म्हापसेकर, चंद्रकांत परब, सदाशिव परब, गंगाराम बिरोडकर,नंदू बिरोडकर,विजय बिरोडकर,बादल सावंत, रामकृष्ण गावडे, प्रकाश गावडे, संतोष गावडे, दिप्ती म्हापसेकर,सौ पेडणेकर,सौ वसुधा बिरोडकर, मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!