कातवण-वरचीवाडी येथे अवैध गोवा दारू जप्त
कातवण-वरचीवाडी येथे अवैध गोवा दारू जप्त
देवगड
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गच्या पथकाने तालुक्यातील कातवण वरचीवाडी येथे टाकलेल्या छाप्यात सुमारे ३० हजार ९०० रुपयांच्या गोवा बनावटी दारुचा अवैध साठा जप्त केला. याप्रकरणी दिनेश केशव जोईल या संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ ई नुसार कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी सायंकाळी साडेसहा
वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.देवगड पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल रवी इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित दिनेश जोईल याच्याजवळ मॅकडॉल नं. १ च्या २४ बाटल्या (रुपये ४८००) बॉब्ज लेमन व्होडकाच्या ७२ बाटल्या (७२०० रुपये), हायवॉर्डस फाईन व्हिस्कीच्या १८९ बाटल्या (१८,९०० रूपये) असा एकूण ३० हजार ९०० रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली.

