कोकण

कनकनगर मध्ये भाजपच्या वतीने हळदीकुंकू समारंभ

 

*महिला वर्गाचा उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद*

कणकवली (प्रथमेश जाधव)- कनकनगर येथील महापुरुष मंदिरात प्रभाग क्रमांक १७ मधील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांना वाण देत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. यामध्ये ४०० हुन अधिक महिलांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे, नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, शहराध्यक्षा प्राची कर्पे, संजीवनी पवार आदी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!