चिपळुणातील अपरांत हॉस्पिटलमध्ये आधुनिक नेत्रविकार विभाग, एन्डोस्कोपीसह मानसिक समुपदेशनची सुविधा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१७: शहरातील अपरांत हॉस्पिटल येथे नव्याने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त नेत्रविकार विभाग, एन्डोस्कोपी व मानसिक समुपदेशन या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती अपरांत हॉस्पिटलचे संचालक डॉ. यतीन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. जाधव पुढे म्हणाले की, मुंबई येथील नेत्र शल्यचिकित्सक डॉ.पवन सावंत व डॉ.कस्तुरी दाभोळकर अपरांत हॉस्पिटल येथे दर मंगळवार, शुक्रवार, शनिवार व रविवार सकाळी ११ वा. ते दुपारी २ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करतील. गरज असेल त्यांच्या शस्त्रक्रिया माफक दरात, आधुनिक सामग्री व उत्तम दर्जाची लेन्स वापरून अपरांत हॉस्पिटलच्या लॅमिनर एअर प्रयुक्त जंतुसंसर्ग विरहित मॉडर्न शस्त्रक्रिया गहात करण्यात येणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी चिपळूण व नजीकच्या दहा किलोमीटर परिघातील येणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वृध्द रुग्णांना अॅम्ब्युलन्स पिकअपवरची सुविधाही देण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. मुंबईमध्ये नेत्रविकार चिकित्सा या क्षेत्रात अत्याधुनिक प्रशिक्षण घेतलेल्या डॉ. सावंत यांनी आतापर्यंत शेकडो रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्यांना निर्दोष दृष्टी प्राप्त करून दिली आहे. नूतन नेत्रविकार विभागामध्ये मोतीबिंदू तपासणी, काचबिंदू तपासणी, डोळ्यांतील तपासण्या कॉम्प्युटर विजन विविध प्रकारचे चष्मे व कॉन्टॅक्ट प्रक्रिया सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यासाठी हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आय.सी.यु., शस्त्रक्रिया विभाग आणि अद्ययावत रेडियोलॉजी या विभागासोबत स्वतंत्र नेत्रशल्य चिकित्सा विभाग सुरु केल्याने एकाच छताखाती सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या ध्येपूर्तीसाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले. याबरोबरच एन्डोस्कोपी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेमुळे अन्ननलिका, जठर व आतडे या पचन संस्थेतीत अवयवांच्या विकारांचे निदान करण्यासाठी उपयोग होणार आहे. या सुविधेमुळे संबंधित रुग्णांचे अचूक निदान व तत्पर उपचार होण्यास मदत होणार आहे. यासाठी अद्ययावत आय.सी.यु. सुविधा, स्कॅन, सोनोग्राफी, डायलिसिस यांसारख्या सर्वोच्च तंत्रज्ञानाने युक्त सुविधांसोबतच लेमिनर एअर फ्लो युक्त ओटीसह एन्डोस्कोपीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून एम.एस, जनरल सर्जन डॉ.सद्गुरू पाटणकर, एम. एस, लॅपरोस्कोपिक आणि एडोस्कोपिक सर्जन डॉ.प्रदीप भालेराव रुग्णांना सेवा देणार आहेत.
*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*
_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_
*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*
*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..
*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰
*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰
🏃🏻♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻♀️
*🔮 आमचा पत्ता 🤷🏻♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

