आपत्कालीनवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

झोपेत सर्पदंष झाल्याने मांगवलीतील संतोष नरसाळे यांचे निधन..

▪️वेळेत उपचार झाले नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१७: झोपेत असताना सर्पदंश होऊन मांगवली नरसाळेवाडी येथिल एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष चंद्रकांत नरसाळे (वय ४२) अस मयताचे नाव आहे. कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालयात आज त्यांचा मृत्यू झाला. वेळेत उपचार झाले नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. संतोष नरसाळे हे सोमवारी रात्री जेवण आटपून घरी झोपी गेले होते. निद्रावस्थेत असतानाच त्यांना सापाने दंश केला. वेदना होऊ लागल्यामुळे त्यांनी उठून पाहिले तर सर्पदंश झाल्याचे लक्षात आले. त्यांनी आपल्या नातेवाईकांना याची कल्पना दिली. नातेवाईकांनी खाजगी वाहनातून तात्काळ उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, याठिकाणी उपचार होऊ शकले नाहीत. तेथून त्यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथूनही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे.

*_💥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..💥_*

*🔥SALE!!!🔥SALE!!!🔥SALE!!!🔥*

*_🪔दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ब्रँडेड कपडे खरेदी करा आणि मिळवा ५०% ची सूट_💰*

_🏃🏻‍♂️👖👕वाट कसली बघताय? आज भेट द्या सयानी ड्रेसेस ह्या कपड्याच्या दालनाला! आणि मिळवा आपल्या आवडत्या कपड्यांवर ५०% ची सूट_💰🏃🏻‍♀️

*🏩आमचा पत्ता*
*सयानी ड्रेसेस*
उभाबाजार, चितारआळी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
*_📱संपर्क : 9423818666_*

*🔮ऑफर काही मर्यादित दिवसांसाठीच..*
*🔮अटी व शर्ती लागू..*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!