महाराष्ट्रसामाजिक

बुधवार पासून दररोज दोन हजार भाविकांना मिळणार श्री विठ्ठलाचे दर्शन; मंदिर समितीचा निर्णय

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : पंढरपूर

🎴पंढरपूर,दि.१७: पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवार पासून दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे राज्य शासनाने उघडण्यास परवानगी दिली आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज एक हजार भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येत होते, आता दर्शनाकरिता दोन हजार भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मात्र नित्योपचार दैनंदिन सुरु राहिले. दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांना दर्शनाकरीता खूली करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा, श्री विठ्ठल सभामंड, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदींची कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल, याची खबरदारी घेण्यात येत आहे, त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात दर्शनाकरीता येणाऱ्या भाविक, भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता पासून भाविकांना दर्शनाकरीता सोडण्यात येत आहे.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या पास धारकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याने भाविकांनी  http://www.vitthalrukminimandir.org/home.html या संकेत स्थळावर नोंदणी करावी, असे आवाहनहीं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.

भाविकांसाठी नियमावली
★सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत 2000 भाविकांना मुख दर्शन घेता येणार..

★प्रति तास 200 भाविकांना दर्शनाकरीता सोडणार..

★दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी करावी..

★भाविकांनी 24 तास अगोदर ऑनलाईन बुकींग करावे, बुकींग 8 दिवसापर्यंत करता येणार..

★मुख दर्शनाकरीता कासार घाट येथे पास तपासणी करुन दर्शनाला सोडणार..

★कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्यांना दर्शन प्रवेश बंद..

★मंदिराच्या पूर्व गेट मधून भाविक दर्शनाला आत जातील तर व्हीआयपी गेटमधून बाहेर पडतील..

★दर्शन रांगेत फिजिकल डिस्टन्स (दोन भाविकात 6 फुट अंतर) ठेवण्यासाठी जागोजागी मार्किंग करण्यात आले आहे..

★अन्नक्षेत्र व प्रसाद व्यवस्था बंद राहील..

★सध्या 65 वर्षावरील नागरिक, 10 वर्षाखालील बालक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांनी दर्शनास येणे टाळावे..

*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!