कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा ची डाटाव्य वस्थापन व उपयोग बैठक संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा ची डाटा

व्यवस्थापन व उपयोग बैठक संपन्न

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी:- शनिवार दिनांक २१ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा ची डाटा व्यवस्थापन व उपयोग बैठक केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महीलाभवन- ओसरगाव, कणकवली येथे संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेशजी राणे, माजी आमदार अजितराव गोगटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुलजी काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत व मनोज रावराणे, युवा मोर्चाचे भाई सावंत, प्रज्ञा मंचचे डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते .
डाटा व्यवस्थापन विभागाचे जिल्हा
संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी अभियानाची माहिती दिली. तसेच अभियानाचे चार टप्पे समजावून सांगितले. तसेच भविष्यात येणाऱ्या निवडणूका तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पुर्व तयारी म्हणून या विषयाकडे बघणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या बैठकीत जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, विविध मोर्चा – आघाडी सेलचे पदाधिकारी व आजी / – माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते ..
या बैठकीत डेटा व्यवस्थापन आणि उपयोग जिल्हा समीतीचे सह संयोजक प्रभाकर सावंत, आईटी ( IT ) चे केशव नवाथे, सोशल मीडिया चे समिर प्रभुगांवकर, जिल्हा संवादक सौ.सई चेंदवनकर इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!