मळगाव येथे पकडलेला मुलींना घेऊन जाणार तो कंटेनर संशयाच्या फेऱ्यात
कंटेनर मध्ये कोंबून अशाप्रकारे मुलींची वाहतूक करण्याचे प्रयोजन काय?
पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सखोल तपास करण्याची गरज
सावंतवाडी, दि.२०: मळगाव येथे 20 ते 25 युवक युवतीने घेऊन जाणारा कंटेनर ग्रामस्थांनी पकडला. यानंतर बघ्यांची फार मोठी गर्दी झाली. पोलीस निरिक्षक फूलचंद मेंगडे घटनास्थळी दाखल झाले व चौकशी केली या चौकशीत युवक युवती ह्या हॉटेलमधील एका प्रोग्रामसाठी वेटर म्हणून काम करण्यासाठी जात असल्याचा प्राथमिक खुलासा करण्यात आला आहे. मात्र बंदिस्त कंटेनर मधून त्या युवक युवतींना नेमके कशासाठी नेले जात होते यांच्या मुळाशी पोलिसांनी जावे अशी मागणी ग्रामस्थां मधून केली जात आहे.
यामध्ये कोणते रॅकेट तर नाही ना? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित करत पोलिसांकडे सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. सर्व युवक युवती व इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या सर्व प्रमुखांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांची चौकशी केली जाणार आहे.
त्या युवक युवतींच्या घरच्या लोकांशी संपर्क साधून आपली मुले कुठे आहेत,कोणते काम करतात याची चौकशी होणे गरजेचे आहे,व त्यातील काही मुले अल्पवयीन असल्याने समजते त्यामुळे अशा अल्पवयीन मुलांना कामाला लावणाऱ्या व्यक्तीवर कायद्याने कठोर कारवाई केली जावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे.त्या कंटनेर चालकावरही मनुष्य वाहतूक परवाना नसताना बेकायदेशीर वाहतूक केली म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी होत आहे

