कारिवडे कुंभारवाडी येथील निराधार वृद्ध दांपत्यांना सामाजिक बांधिलकीचा आधार.
कारिवडे कुंभारवाडी येथील निराधार वृद्ध दांपत्यांना सामाजिक बांधिलकीचा आधार.
हरिश्चंद्र शेटकर वय 81 तारामती शेटकर वय 71 या निराधार वृद्ध दांपत्यांना आपल्या वृद्ध अवस्थेमध्ये हालाकीचे जीवन जगावं लागत आहे वृद्ध तारामती चक्कर येऊन पडल्यामुळे तिचा हात फॅक्चर झाला त्यावेळी एका सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्याने तिला सावंतवाडी सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्या वृद्ध महिलेच्या हाताला फॅक्चर असून हॉस्पिटलमध्ये गेले चार दिवस उपचार घेत होत्या.
वृद्धपणाच्या काळात उपासमारामुळे हे वृद्ध दांपत्य हलाखीचे जीवन जगत असल्याची माहिती हॉस्पिटलमधील सिक्युरिटी गार्ड अडाळकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांना दिली असता सामाजिक बांधिलकीची टीम तत्काळ हॉस्पिटलमध्ये पोचली. त्यावेळी त्या निराधार वृद्ध दांपत्यांनी सामाजिक बांधिलकी समोर आपली व्यथा मांडली आम्हाला मुल -बाळ नसल्यामुळे या वयामध्ये कष्ट करून जीवन जगणं कठीण झालेला आहे. काही खायला न मिळाल्यास उपाशी झोपावं लागतं तर आजारी पडतो तेव्हा पैसे नसल्यास डॉक्टर कडे पण जाणं कठीण होऊन जातं घरामध्ये अन्नाचा एक कणही नाही तर पदरी एकही पैसा नाही अशी दुखभरी कहानी त्यांनी सामाजिक बांधिलकीसमोर व्यक्त केली. त्यांना डिस्चार्ज होऊन एक दिवस झाला होता परंतु घरी परतण्यासाठी पैसे नसल्यामुळे घरी पोचणे कठीण झाले होते. अशावेळी सदर पेशंटचा डिस्चार्ज घेऊन सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्ते प्रा. सतीश बागवे, हेलन निबरे, रवी जाधव, संजय पेडणेकर यांनी औषध पाण्यासाठी आर्थिक मदत केली तसेच राशन घेऊन दिले. तर ॲम्बुलन्स चे मालक इन्सुली हेमंत वाळके व चालक लक्ष्मण शिरोडकर यांनी विनामूल्य त्या दांपत्यांना त्यांच्या राहत्या घरी कारिवडे येथे सुखरूप सोडले .

