ठाणेशासकीयसामाजिक

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेकरीता करारावर सागर मित्र भरती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴ठाणे,दि.15: सागरी जलक्षेत्रात पुरेपुर वापर करुन मत्सोत्पादनात वाढ करणे, मुल्यवर्धन व निर्यात मुल्यात वाढ करणे, जलक्षेत्राची सरासरी उत्पादकता वाढविणे आणि काढणीपश्चात नुकसान कमी करणे याद्वारे एकूणच राष्ट्रीय दरडोई उत्पादन वाढ करणे या करीता केंद्र शासनाने महत्वाकांक्षी प्रधानमंत्री मत्ससंपदा योजना मंजुर केली आहे. सदर योजनेच्या सुसुत्रीकरण व समन्वयकरीता ठाणे या सागरी जिल्ह्यांमध्ये सागर मित्र या अभियानाची 05 पदे 11 महिने या कालावधी करिता निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर भरावयाची आहेत.

उमेदवार हा पदवीधर असावा, स्थानिक भाषांचे ज्ञान असावे, स्थानिक ठिकाणी वास्तव्यास असणारे उमेदवारांस प्राधन्य ,अर्जदार चे 35 वर्षा पेक्षा जास्त नसावे.दरमहा एकत्रित मानधन रु 10000/- हजार रुपये,(उल्लेखनिय/उत्कृष्ट कामांस अतिरीक्त मानधन रु.5000/- अनुज्ञेय राहील. कामाचे ठिकाण ठाणे जिल्ह्यातील डोंगरी चौक, उत्तन, उत्तन भाटये, वाशी ब्रिज, दिवाळे, असे आहे. सागर मित्र नियुक्ती ही योजना कालावधीसाठी निव्वळ तात्पुरती नियुक्ती असून योजना संपल्यावर सदर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. तसेच या आधारे अर्जदारास भविष्यात शासकीय नोकरीचा कोणताही दावा करता येणार नाही. मुलाखतीसाठी येणे व जाणे यासाठी कोणताही भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

इच्छुक अर्जदारांनी शैक्षणिेक पात्रता, वय (जन्मतारीख), रहिवास व अनुभवाच्या पुरावा तसेच संपर्क ई-मेल व दुरध्वनी क्रमांकासह आपला अर्ज 26 नोव्हेंबर 2020 वा तत्पुर्वी sangamitra.thane@gmail.com या मेलवर पाठवा.

कार्यालयाचा पत्ता-सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (ता), ठाणे पालघर यांचे कार्यालय, 4 रॉयल पॉईट-2 जुना तळवलकर हॉल, कचेरी रोड, पालघर (प)-401404 असा आहे. अधिक माहिती  या https://nfdb.gov.in/guidline संकेत स्थळावरवर उपलब्ध संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अधिकारी ठाणे-पालघर आनंद पालव यांनी केले आहे.

*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*

_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_

*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*

*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..

*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰

*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰

🏃🏻‍♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻‍♀️

*🔮 आमचा पत्ता 🤷🏻‍♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!