कणकवलीतील ऋषभ पिळणकर चे दुःखद निधन..
▪️पिळणकर कुठुंबीयांवर ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१५: शहरातील पिळणकरवाडी येथील ऋषभ (ऋत्विक) विजय पिळणकर (वय २२) याचे आज पहाटे दुःखद निधन झाले. ताप येत असल्याने त्याला शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्हारुग्णालयात उपचारादरम्यान या युवकाचा आज पहाटे मृत्यू झाला. प्राथमिक कोविड-१९ अँटीजेन तपासणीत रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, त्या युवकाचा मृत्यू कशाने झाला? याबाबत स्पष्ट झाले नाही. पिळणकर कुठुंबीयांवर ऐन दिवाळीत दुःखाचा डोंगर कोसळला. गेले चार दिवस ऋत्विकला ताप येत होता. शनिवारी अचानक अधिक त्रास जाणवू लागल्याने त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात किंवा अन्य ठिकाणी हलवण्यास सांगितले. त्यानुसार नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पाश्चत वडील, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
*_💥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..💥_*
*🔥SALE!!!🔥SALE!!!🔥SALE!!!🔥*
*_🪔दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ब्रँडेड कपडे खरेदी करा आणि मिळवा ५०% ची सूट_💰*
_🏃🏻♂️👖👕वाट कसली बघताय? आज भेट द्या सयानी ड्रेसेस ह्या कपड्याच्या दालनाला! आणि मिळवा आपल्या आवडत्या कपड्यांवर ५०% ची सूट_💰🏃🏻♀️
*🏩आमचा पत्ता*
*सयानी ड्रेसेस*
उभाबाजार, चितारआळी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
*_📱संपर्क : 9423818666_*
*🔮ऑफर काही मर्यादित दिवसांसाठीच..*
*🔮अटी व शर्ती लागू..*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

