महामार्ग पोलिस मदत केंद्र कणकवली, कसाल यांच्या वतिने ‘रस्ता सुरक्षा अभियान’ कार्यक्रम संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.१५: मुंबई अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महामार्ग च्या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने मिळालेल्या सूचनेप्रमाणे तसेच पोलीस अधीक्षक, रायगड, व पोलीस निरीक्षक, म.पो.वि. रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलिस मदत केंद्र कणकवली, कसाल यांच्या वतिने ‘रस्ता सुरक्षा अभियान’ संबंधित कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी वाहन चालक, मालक यांना रस्ता वाहतूक नियमांबाबात माहिती, प्रबोधन व मास्क वाटप केले. तसेच दिवाळी सणा निमित्ताने चालकांना फराळाचेही वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी वाहतूक महामार्ग मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण जाधव म्हणाले शासनाचा नियमांचे पालन करतात तसेच अहोरात्र मेहनत घेऊन हे वाहनचालक आपल्या कुटुंबापासून, अनेक महिने बाहेर प्रवास करत असतात त्यांना कोणताही धार्मिक उत्सव सण साजरा करायला घराकडे जाता येत नाही. त्यांच्या सुखदुःखात दिवाळीचा आनंद व एक खारीचा वाटा म्हणून दिवाळी फराळाची भेट देऊन शुभेच्छा दिल्या. आमचे सर्व अधिकारी, सहकारी कर्मचारी एकत्र येऊन हे कार्यक्रम आम्ही राबवतो. गेली अनेक वर्षे विविध कार्यक्रम याच प्रमाणे आम्ही राबविले आहेत. वाहतूकीचेही नियमांचे पालन करावे, उल्लंघन करू नये, याबाबतही जनजागृती केली,जाते. वाहन चालवताना मोबाईल वापर न करणे, जड अवजड वाहने डाव्या बाजूने चालवावे. मद्य प्राशन न करणे, सीटबेल्ट लावणे, मोटार सायकल चालवताना हेल्मेट घालणे ,अतिशय वेगाने वाहने चालवू नये. रिप्लेक्टर पट्टी लावून घेणे, टेल लॅम्प नेहमी तपासणी करावी व बंद असेल तर दुरूस्त करून घ्यावी याबाबत माहिती अरुण जाधव यांनी देत “माझे कुटुंब “माझी जबाबदारी” व खबरदारी घेण्याबद्दल ही प्रबोधन करण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथील टोल नाका येथे वाहतूक पोलीस महामार्गाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप केले. यावेळी वाहतूक महामार्ग पोलीस सहाय्यक निरीक्षक अरुण जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

