🟥पोलीस भरतीत १२१ जागांसाठी आठ हजार उमेदवारांचे अर्ज
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.३०:* सिंधुदुर्ग पोलीस दलातील शिपाई चालक पदाच्या २२ जगांसाठी २ हजार १२६ अर्ज आणि पोलीस शिपाई पदाच्या ९९ जागांसाठी ५ हजार ९५८ अर्ज पोलीस भरतीमधील अशा एकूण १२१ जागांसाठी तब्बल ८ हजार ८४ उमेदवारांचे अर्ज
आले आहेत.२जानेवारी २०२३पासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली आहे.
राज्यात एकाच वेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. सिंधुदुर्ग पोलीस दलात रिक्त असणाऱ्या शिपाई चालक व पोलीस शिपाई पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सौरभकुमार पोलीस शिपाई चालक पदासाठी एकूण २२ जागासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी २ हजार १२६ उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. तर पोलीस शिपाई पदाच्या एकूण ९९ जागासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी ५ हजार ९५८ अर्ज आलेले आहेत.पोलीस भरतीसाठी अगोदर मैदानी चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. २ जानेवारीपासून मैदानी चाचणी घेतली जाणार असून प्रथम चालक शिपाई पदासाठी २ ते ४ जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर ५ जानेवारीपासून पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर पोलीस महासंचालक यांच्याकडून प्राप्त
होणाऱ्या आदेशानुसार चालक शिपाई पदासाठी कौशल्य चाचणी व लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.चालक शिपाई व पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी घेताना पुरुषासाठी १६००मीटर धावणे व गोळफेक महिलांसाठी ८०० मीटर धावणे व गोळा फेकची चाचणी घेतली जाणार आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची आणि लेखी चाचणी १०० गुणांची होणार आहे. दोन्ही चाचण्यामध्ये प्रत्येकी किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. ४० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार गुणवत्ता यादी करून गुणवत्तेप्रमाणे पोलीस भरती केली जाणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤩खुशखबर..!! 🤩खुशखबर..!! 🥳खुशखबर..!!*
_*🥻👕हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*_
*🤩स्पेशल ऑफर २०% सूट🥳*
*_🥻👘सोलापूरातील सुप्रसिद्ध इरकली कॉटन साडी,इरकली सिल्क साडी, मधुराई कॉटन साडी, धारवाड साडी, मदुराई सिल्क साडी, सेमी पैठणी साडी_*
*_👕👖प्रिंटेड वर्क ड्रेस, कॉटन परकर, टॉप पीस, सोलापूर चादर बेडशीट नॅपकिन, सतरंजी, टॉवेल,दिवानशेट, 🛌🏼प्रिंटेड बेडशीट, शबनम बॅग, पिलो कव्हर लुंगी,बंडी, लेडीज टॉप_*
*💥दिनांक:-१०/१२/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत*
*⏰वेळ-सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*
*🔸स्थळ:-*
*श्री देव नारायण मंदिर,मोती तलाव जवळ सावंतवाडी*
*🎴संपर्क:-* 9325329105
9869890774
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

