आरोस रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज
आरोस रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज
न्हावेली
आरोस गावातील श्री देव रवळनाथचा वार्षिक जत्रोत्सव २८ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी विधिवत पूजा, त्यानंतर केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोस ग्रामस्थांनी केले आहे.
