वेत्येतील ‘त्या’ वृद्धेचे अखेर निधन
वेत्येतील ‘त्या’ वृद्धेचे अखेर निधन
सावंतवाडी
वेंगुर्ले येथील सागरतीर्थ खारफुटी भागात सापडलेली वेत्ये येथील ७० वर्षीय वृद्धा श्रीमती चंदकला चंद्रकांत मिठबावकर हिचे प्रकृती अस्वस्थ्यामुळे सोमवारी सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. वेत्ये येथून चंद्रकला मिठबावकर ही दहा दिवसापूर्वी कारवार येथे माहेरी गेल्या. त्यानंतर बेपत्ता झाली होती. रविवारी सागरतीर्थ खारफुटी भागात एक वृद्ध महिला तेथील ग्रामस्थांना नजरेत पडली. पोलीस व ग्रामस्थांनी तिला होडीच्या सहाय्याने तिला सुखरुप बाहेर आणले. ती गेले दोन दिवस पाण्यात व थंडीत राहिल्याने तिची प्रकृती बिघडली होती. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध लावल्यानंतर ती वृद्धा वेत्ये गावातील असल्याचे निष्पन्न झाले. तिला नातेवाईकांनी उपचारासाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार झाल्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांनी सोमवारी घरी नेले. परंतु, सायंकाळी तिचे निधन झाले. वेत्ये येथील समाजिक कार्यकर्ते नरेंद्र मिठबांवकर यांच्या त्या काकी होत.
