🟥 कणकवली शहरात दोन बंगले आणि दोन कौलारी घर फोडत चोरट्यांचा धाडसी चोरीचा केला प्रयत्न
*🟥 कणकवली शहरात सातत्याने होत असलेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-२७:-* कणकवली शहरात सातत्याने अज्ञात चोरट्यांकडून चोरीचे प्रयत्न सुरु आहेत. चोरट्यांनी पुन्हा मंगळवारी मध्यरात्री कणकवली शहरातील कनकनगर भागातील अंकुश सावंत, सुरभाजी राणे यांच्यासह अन्य दोघांची घरे फोडत ४ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. यापैकी एका बंगल्यामध्ये सोने व रोख रक्कम होती,मात्र,ती चोरट्यांच्या हाती लागली नाही. मात्र,सातत्याने होत असलेल्या कणकवली शहरातील चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र अद्यापही चोरटे पोलिसांना सापडलेले नाहीत. कणकवली कनकनगर येथे चोरी झाल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ,पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र नानचे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत संबंधित घरमालकांची संपर्क साधला.त्या घरमालकांनी आपल्या घरातून कोणताही ऐवज लंपास झाला नसल्याचे प्रथमदर्शनी सांगितले आहे,त्यानंतर शॉन पथकाला प्राचारण करण्यात आले. मात्र, कनकनगर काही भागात श्वान जाऊन घुटमळला. त्यामुळे कणकवली पोलिसांनी याबाबत कोणतीही पोलीस ठाण्यात तक्रार मिळाल्याने या चोरीची नोंद केलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत झालेल्या चोरीबाबत माहिती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान एका घरातून तीन तोळ्याचे मंगळसूत्र, काही रोख रक्कम कपाटात न ठेवता दुसऱ्याच एका जागेवर ठेवल्यामुळे हा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला नाही. सुमारे तीन ते चार लाखाचा ऐवज असल्याचे समजते. चोरी झालेल्या घरातील त्या कुटुंबीयांनी आपला ऐवज व रोख रक्कम आढळल्याने सुटकेचा निःश्वास टाकला आहे .या घरांमध्ये चोरट्याने घुसताना कडीकोयंडे तोडत प्रवेश केला.त्यानंतर असलेली लोखंडी कपाटे तोडून सामानाची विस्काविस्क करत कपडे विस्कटून चोरीला काय साहित्य मिळते का? याचा प्रयत्न चोरट्याने केल्याचे दिसून येत आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

