महाराष्ट्रराजकीय

🟥 शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बारामती, दि-२७ :-* शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांची गायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी राजीनाम्याची मागणी होत असतांना दुसरीकडे त्यांच्या मुलीच्या टीईटी घोटाळ्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मिळवलेल्या माहितीत धक्कादायक बाब समोर आल्याचा दावा नितीन यादव यांनी केला आहे. त्यामुळे नितीन यांच्या दाव्यानुसार अब्दुल सत्तार यांची डोकेदुखी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. टीईटी प्रमाणपत्र नसताना अब्दुल सत्तार यांच्या मुलीला सेवेत कायम कसे केले? असा सवाल उपस्थित करत नितीन यादव यांनी सत्तार यांच्यावर विविध आरोप केले आहेत. हिना कौसर यांचे टीईटी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. हिना यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शाळा सोडल्याच्या / दाखल्यावर वेगवेगळ्या जन्मतारखा असतांना हा त्यांना सेवेत रुजू करण्यात आल्याचे यादव यांनी म्हंटलं आहे. दुसऱ्या कन्येची माहितीच उपलब्ध नसल्याचे संबंधित विभागाचे पत्र नितीन यादव यांना प्राप्त झाले आहे. बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात सत्तार यांच्या मुलीच्या टीईटी प्रमाणपत्रबाबत माहिती मागवली होती.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरुनच या नेमणुका झाल्या का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री अब्दुल सत्तार याच्यावर हिवाळी अधिवेशनात गायरान जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोप करण्यात आले आहे, याशिवाय महिला खासदार यांना शिवीगाळ करणे यावरून राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

हा मुद्दा अधिवेशनात तापलेला असतांना बारामती येथील नितीन यादव यांना माहिती अधिकारात प्राप्त झालेली माहिती सत्तार यांच्या अडचणीत आणखी वाढ करण्यासाठी महत्वाची ठरू शकते.

त्यात अब्दुल सत्तार यांचाही टीईटी घोटाळ्यात सहभाग आहे का? टीईटी घोटाळ्यात सत्तार यांच्या मुलींची नावे आल्यानंतर सत्तार यांना मंत्रीपद भेटणार कि नाही असा सवाल त्यावेळी निर्माण झाला होता.

 

त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असून विरोधकांना सत्तार यांच्या विरोधातील आणखी एक पुरावा राजीनाम्याच्या मागणीसाठी बळ देणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!