जिथे महेश तिथे यश हेच तालुक्याचे समीकरण
जिथे महेश तिथे यश हेच तालुक्याचे समीकरण
महेश सारंग ठरले सावंतवाडी तालुक्याचे किंग मेकर
कारीवडे कुणकेरी, आंबेगाव,माडखोल,सह पंचक्रोशीत महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा फडकला एवढेच नव्हे तर त्यांनी मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले.झपाटलेल्या सारखे झोकून देऊन काम केल्याने सावंतवाडी तालुक्यात जिथे महेश तिथे यश हेच समीकरण बनले आहे.
सावंतवाडीत साहेबांची शिवसेना व भाजप यांच्या मध्ये पहिली युती झाली ती खरेदी विक्री संघात व या युतीचं शिल्पकार होते, महेश सारंग,त्याच महेश सारंग यांना साहेबांच्या शिवसेनेबरोबर दोन हात करावे लागले व यात महेश सारंग यांनी त्यांना चारीमुंड्या चीत केले, सावंतवाडी तालुक्यातील ५२ही ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले पाहिजे या एकाच ध्येयाने झपाटल्या सारखे महेश सारंग काम करत होत, आदेश देणारा पदाधिकारी नाही तर जमिनीवर पाय घट्ट रोवून काम करणारा कार्यकर्ता आहे, म्हणूनच तळागाळातील कार्यकर्त्यांशी महेश सारंग यांच्याशी नाळ जुळलेली आहे.याच जोरावर महेश सारंग यांनी तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात राखण्यात यश मिळविले आहे.
त्यांच्या मतदारसंघातील कारीवडे कुणकेरी, आंबेगाव,माडखोल या ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता आली आहे.

