माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मध्ये महाविकास आघाडी चा विजय निश्चित
माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मध्ये महाविकास आघाडी चा विजय निश्चित
सरपंच पदाच्या उमेदवार संजना सावंत यांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकासआघाडी पुरस्कृत सौ. संजना सावंत ह्या सरपंच पदासाठी रिंगणात उभ्या आहेत, त्यांची कपबशी ही निशाणी आहे, तसेच त्यांच्या सदस्य पदासाठी उभे असलेल्या उमेदवाराची निशाणी बॅट, कपाट, टीव्ही,सिलिंग फॅन सर्व निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन करण्यात आले आहे. आज सकाळी संपूर्ण माजगाव मध्ये बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.माजगाव मध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणुक आम्हीच जिंकू असे मत सरपंच पदाच्या उमेदवार सौ. संजना सावंत यांनी व्यक्त केला आहे.

