माजगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत डॉक्टर सौ अर्चना सावंत यांचे पारडे जड
माजगाव ग्रामपंचायत च्या निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसात प्रचाराची रंगत वाढली असून भाजप पुरस्कृत युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार डॉक्टर सौ अर्चना रामचंद्र सावंत या आघाडीवर आघाडीवर असून माजगाव मध्ये उच्चशिक्षित उमेदवाराला निवडून देणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.
भाजपचे पदाधिकारी रामचंद्र उर्फ अजय सावंत यांच्या उच्चशिक्षित असलेल्या पत्नी डॉक्टर सौ अर्चना सावंत या भाजप पुरस्कृत पॅनल मधून निवडणूक लढवत आहेत समाजकार्याची व समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी या निवडणुकीत स्वतःहून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे,त्यांच्या निर्णयाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे,माजगाव मध्ये भाजप व साहेबांची शिवसेना यांच्यामध्ये युती झाल्याने डॉक्टर अर्चना सावंत यांचा विजयाचा मार्ग सुकर असल्याचे बोलले जाते.
आपले मत विकासाला, हक्काच्या व्यक्तीला, गावाच्या जनसेवकाला,उच्चशिक्षित व्यक्तीला, शांत व संयमी नेतृत्वाला, नेहमी लोकांचा आदर करणाऱ्या व्यक्तीला, अशी घोषवाक्य घेऊन डॉक्टर सौ अर्चना सावंत युतीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात आहेत. डॉक्टर सौ सावंत या उच्चशिक्षित असल्याने गावाच्या विकासाला त्याचा फायदा होईल व लोकसंख्येने मोठे असलेले हे गाव विकसनशील गाव म्हणून नावारूपास र येईल असा विश्वास ग्रामस्थांना असल्याने, ग्रामस्थांनी डॉक्टर अर्चना सावंत यांच्या पारड्यात आपली मते टाकण्याचा निर्धार केल्याचे बोलले जाते.

