🟥 शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा कसोटी माजगाव मध्ये लागणार..
🟥 तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष..*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१३:-* लोकसंख्येने सर्वात मोठी असलेली माजगाव ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा कस लागणार असून शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा कसोटी माजगाव मध्ये लागणार आहे, सद्यस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
पाच वर्षांपूर्वी माजगाव ग्रामपंचायत मध्ये मोठी रंगात आली होती माजी जि प सदस्या रेश्मा सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, विरुद्ध विक्रांत सावंत अशी रंगत होती, यावेळी आरोप प्रत्यारोप ही मोठ्या प्रमाणात झाले होते ,त्यावेळी संजू परब यांनी विक्रांत सावंत यांना सिनेमात काम करावे व विटू दांडू खेळावा अशी टीका केली होती, मात्र विक्रांत सावंत यांनी त्यावेळी आपली सर्व ताकद पणाला लावून माजगाव ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून आणून आपले वर्चस्व सिद्ध केले होते.
पुन्हा एकदा या भागात विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाचा कस लागणार असून सध्या तरी त्यांचे सरपंच पदाची उमेदवार संजना सावंत यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. त्यामुळे माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवारांनी व सरपंचांनी बाजी मारली तर विक्रांत सावंत पुन्हा एकदा किंग मेकर ठरणार आहेत, त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

