🟥 दोडामार्ग तालुक्यातील सर्वात भ्रष्ट विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग..
*🟥 कार्यकारी अभियंता श्रीमती अनामिका जाधव व शाखा अभियंता अनिल बडे याला पूर्णपणे जबाबदार..*
*🟥 मनसे माजी तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य मांगेली सुनील गवस यांचा गंभीर आरोप..*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-१२:-* शाखा अभियंता अनिल बडे यांनी दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची फार दयनीय अवस्था स्थानिक ठेकेदारांना हाताशी धरून त्यांनी केलेली आहे. मांगेली धबधबा अशा पर्यटन स्थळी जाणाऱ्या रस्त्याचे काम शाखा अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्या संगनमताने होत आहे. यातच एक उदाहरण म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी मांगेली सरपंच व काही ग्रामस्थांनी सदरचे निकृष्ट दर्जाचे चाललेले काम रोखले होते. मात्र शाखा अभियंता अनिल बडे यांच्याशी संपर्क साधला असता सदरचे काम हे निकृष्ट नसून उत्कृष्ट दर्जाचे आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
तसेच दोडामार्ग-आई, दोडामार्ग -बांदा, दोडामार्ग-बीजघर या रस्त्यांची सुद्धा संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहेत. तसेच मांगेली येथून कर्नाटक हद्दीकडे जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा केलेला आहे. याला जबाबदार कोण? बांदा -दोडामार्ग या रस्त्याच्या कडेने जाणारी गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी एम एन जी एल या कंपनीने नेमलेल्या कंत्राटी ठेकेदारांकडून अमानुषपणे खोदकाम होत आहे. तसेच एम एन जी एल या कंपनीने रस्त्याच्या साईड पट्टीची आपल्याकडून होणारी नुकसान भरपाई म्हणून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही रक्कम वर्ग केलेली आहे का? तशी असल्यास बांदा ते दोडामार्ग या रस्त्याची साईड पट्टी मजबूत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग का अनास्था दाखवते? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
मणेरी पूल व मणेरी बाजार यामध्ये येणाऱ्या रस्त्याच्या साईड पट्टी व रस्त्याच्या मधोमध चर पडलेला आहे. मात्र एक वर्ष होऊन सुद्धा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व त्याचे शाखा अभियंता डोळे झाक करत आहेत.
सासोली मंदार हॉल या ठिकाणी रस्त्याचा काही भाग खराब झालेला होता व तो यावर्षी मे महिन्यामध्ये करण्यात आला होता तर चार-पाच महिन्यातच सदर रस्त्यावरती खड्डे पडले होते. ते बुजवून संबंधित ठेकेदार व शाखा अभियंता यांनी लोकांच्या डोळ्यात धुळ फेकलेली आहे.
नक्की काय दडलय यामागे? दोडामार्ग तालुक्यातील सर्वच पक्षानी सदर एम एन जी एल कंपनीचे काम लोकहितासाठी रोखले होते. मात्र आता सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गप्प का आहेत? असा संभ्रम निर्माण झालेला आहे.
गेल्या वर्षी काही अवजड वाहने व लहान वाहने बांदा -दोडामार्ग एम एन जी एल कंपनीने खोदकाम केलेल्या त्याच्या साईड पट्टी वरती रुतली होती व अपघात ग्रस्त झाली होती. याला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम उपविभाग शाखा अभियंता जबाबदार आहेत. त्यांच्या हलगर्जीपणामुळे सदर बांदा ते दोडामार्ग या रस्त्यावरती जीवितहानी होण्यास वेळ लागणार नाही तसे झाल्यास कार्यकारी अभियंता अनामिका जाधव व दोडामार्ग शाखा अभियंता अनिल बडे पूर्णपणे जबाबदार राहतील. याची नोंद घ्यावी. असे मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य मांगेली सुनील गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांवरती कोणाचा आशीर्वाद आहे. हे समजणे सुद्धा फार महत्त्वाचे आहे.संबंधित अधिकाऱ्यांवरती वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे. मनसेचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे व सिंधुदुर्ग चे नेते पर्शुराम उर्फ जीजी उपरकर यांची भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असे गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_
_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)
साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200
*टेबल कॅलेंडर*
*आर्ट कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*पॉकेट कॅलेंडर*
_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._
*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*
*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*
तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)
*टेबल कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*डेट डायरी*
*पॉकेट डायरी*
विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू
*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*
*🔸प्रसाद ऑफसेट*
_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_
*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

