कणकवलीकोकणसिंधुदुर्ग

उद्या होणार कणकवलीत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंची एन्ट्री ; पटवर्धन चौकात होणार जल्लोषी स्वागत

उद्या होणार कणकवलीत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंची एन्ट्री ; पटवर्धन चौकात होणार जल्लोषी स्वागत

 

*पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, राजसाहेब प्रेमी जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी केले…!*

 

*कणकवली I प्रथमेश जाधव*

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. यात ते जिल्ह्यातील विविध ठिकाणचा पक्ष वाढीच्या दृष्टीने भागातील आढावा घेत असुन, यासह आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांशी पक्ष बांधणी संदर्भात बैठका घेऊन चर्चा करणार आहेत.

 

शुक्रवारी सकाळी ९ वाजता आई भराडी देवीचे दर्शन घेऊन राज ठाकरे यांचं ११ वाजता कणकवली पटवर्धन चौकात आगमन होणार आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षप्रमुख राज ठाकरे यांचं जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ वा. राज ठाकरे पत्रकारांशी व प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी पक्षवाढी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी केले आहे. दौऱ्यानंतर दुपारी ३ वाजता राज ठाकरे राजापूरकडे प्रयाण करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!