अचानक थांबलेल्या अज्ञात चार चाकी वाहनाला चुकविण्या च्या प्रयत्नात पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीपटे येथील रिक्षाला मळगाव येथे विचित्र अपघात..
🟥
*🟥 रिक्षा चालक बंड्या चौगुले हे जबर जखमी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-१६ :-* अचानक थांबलेल्या अज्ञात चार चाकी वाहनाला चुकविण्या च्या प्रयत्नात पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीपटे येथील रिक्षाला मळगाव येथे विचित्र अपघात झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास मळगाव येथील शालु मंगल कार्यालय समोर घडली.या अपघातात रिक्षा चालक बंड्या चौगुले हे जबर जखमी झाले असून त्यांना सावंत वाडी येथील शासकीय रुग्णलयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चीपटे येथील बंड्या चौगुले हे आपली रिक्षा क्रमांक एम. एच. ०७ ए एच १००६ ही रिक्षा घेवून मळगाव येथून सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते.यावेळी त्यांच्या रिक्षा मध्ये कोणी प्रवासी नव्हते.त्यांची रिक्षा मळगाव येथील शालू मंगल कार्यालय येथे आली असताना येथील रस्त्यात मधोमध थांबलेल्या व रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता याचवेळी सावंतवाडी रेल्वे स्थानकावरुन मळगावच्या दिशेने जाणारे मळगाव येथील बोलेरो टेम्पो चालक हेमनाथ गोसावी यांच्या टेम्पो क्रमांक एम.एच.०७ पी.३७६४ या पिकअप टेम्पोला समोरुन जोरदार धडक बसली.ही धडक एवढी जोरदार होती की,रिक्षाचा पुढील भाग व काचेचा चक्काचूर झाला.मात्र रिक्षा चालक बंड्या चौगुले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबत सावंतवाडी पोलिसांना कळविण्यात आले.मात्र एक तास उलटला तरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते.दरम्यान रस्त्याच्या मधोमध उभी करुन ठेवण्यात रिक्षा दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली.यावेळी घटनास्थळी भाजप नेते राजू परब, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर व मळगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

