कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी आगारातून बदलून गेलेले वाहक बी,सी, राठोड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

सावंतवाडी आगारातून बदलून गेलेले वाहक बी,सी, राठोड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

सावंतवाडी आगारातून बदली करून गेलेले व सध्या जिल्हा नांदेड तालुका भोकर या ठिकाणी कार्यरत असणारे वाहक बी सी राठोड यांना आज सकाळी अचानक हृदयविकाराचा धक्का बसून प्राणज्योत मालावली. त्यांच्या अचानक जाण्याने एक चांगला मित्र गमावला असल्याचे सावंतवाडी आगारातील वाहक -चालकांनी सांगितले.
न्यू सबनिसवाडा बिरोडकर टेंब येथे ते मधुकर गोसावी व, दत्ताराम बिरोडकर यांच्या जवळी बरीच वर्षे भाड्याने कुटुंबासहित वास्तव्यास होते,स्वभावाने मनमिळावू,व माणसे जोडणारे राठोड होते त्यामुळे बिरोडकर टेंब परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा, पत्नी,भाऊ,वहिनी,पुतणे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!