कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

भटवाडी येथील अपघातात कोलगांव येथील तरुण गंभीर जखमी

भटवाडी येथील अपघातात कोलगांव येथील तरुण गंभीर जखमी

अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविले

सावंतवाडी, दि.१३ : दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावलेल्या टेम्पोला आढळल्याने कोलगाव येथील तरुण. लक्ष्मण टिळवे वय ४० आपल्या दुचाकीने जात असताना भटवाडी येथे रस्त्याच्या बाजूला लावलेल्या टेम्पोला आढळल्याने गंभीर जखमी झाला अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.
सदरचा अपघात काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भटवाडी येथे माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांच्या घरासमोर घडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, टिळवे हे आपले काम संपून रात्री कोलगाव येथील घरी जात होते. यावेळी भटवाडी परिसरात रस्त्यावर असलेल्या टेम्पोचा त्यांना अंदाज आला नाही आणि त्यांच्या गाडीची धडक टेम्पोला बसली यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली हा अपघात झाल्याचे कळतात परिसरातील नागरिक अमित आसोलकर, सागर पालेकर, वैभव सुभेदार, निकेश पेडणेकर, सामाजिक बांधिलकी रवी जाधव व संजय पेडणेकर यांनी धाव घेतली व त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.
त्यांच्या सिटीस्कॅनचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना उशिरा रात्री अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले. त्यासाठी रवी जाधव यांनी गोवा बांबोळी येथे जाण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!