🟥 धूम स्टाईल गाड्या हाकणाऱ्या शहरासह परिसरातील महाविद्यालयीन युवकांना आवरा..
🟥 मनसेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसीफ सय्यद यांना निवेदन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-११:* धूम स्टाईल गाड्या हाकणाऱ्या शहरासह परिसरातील महाविद्यालयीन युवकांना आवरा, आवश्यक असल्यास त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी आज येथील मनसेच्या वतीने सावंतवाडी पोलिसांकडे करण्यात आली आहे. बेदकार वाहने चालवल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. याचा नाहक मनस्ताप सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. तशा तक्रारी काही नागरिकांनी आमच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान येत्या एक-दोन दिवसात नाकाबंदी करून अशा बाईक स्वारांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. याबाबतचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसीफ सय्यद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, प्रवीण गवस, सचिव कौस्तुभ नाईक, दर्शन सावंत, सोनू सावंत, रवींद्र दळवी आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शहरासह लगतच्या परिसरात असलेल्या महाविद्यालयीन युवक धूम स्टाईल गाड्या चालवत आहेत. त्यामुळे अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. अशा युवकांसह अनेकांना अपघात घडले आहेत. काही वेळा पादचाऱ्यांना सुद्धा अपघात होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. याबाबतच्या तक्रारी वारंवार मनसेकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रमुखांना आम्ही सूचना दिल्या. मात्र महाविद्यालय सुटल्यानंतर आमची जबाबदारी संपते, असे सांगून काहींनी हात वर केले आहेत. त्यामुळे याकडे पोलीस प्रशासनानेच गांभीर्याने पहावे. अशा धूम स्टाईल बाईक स्वारांना त्यांनी आवर घालावा. वेळ पडल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुद्धा सकारात्मकता दर्शवत येत्या दोन-तीन दिवसापासूनच महाविद्यालयीन धूम स्टाईल बाईक स्वारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली जाईल. त्यासाठी शहरात नाकाबंदी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

