गजानन नार्वेकर यांचे निधन
गजानन नार्वेकर यांचे निधन
आंबोली
आंबोली बाजारवाडी येथील गजानन भिकाजी नार्वेकर (७८) यांचे राहत्या घरी बुधवारी निधन झाले. आंबोली बाजारवाडी येथील प्रसिद्ध नार्वेकर मेसचे (हॉटेल) ते मालक होते. गेली ४० वर्षे त्यांनी आंबोलीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना नार्वेकर मेसच्या माध्यमातून चविष्ट, स्वादिष्ट जेवणाचा आनंद दिला होता. तसेच त्यांनी सुरुवातीच्या काळात ‘तरुण भारत’ वृत्तपत्र विक्रेते म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी त्यांनी
छोटासा सायकल व्यवसायही सुरू केला होता. गरिबीतून वर येत त्यांनी सर्वाना मदतीचा हात दिला होता. कोणताही कार्यक्रम असो. त्या कार्यक्रमाला नार्वेकर यांच्याकडून मदत ही मिळेच. नार्वेकर हे दानशूर व्यक्तिमत्व होते. तसेच ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, भावजय, पुतणे, मुलगी, जावई असा परिवार आहे. सामजिक कार्यकर्ते नितीन नार्वेकर, प्रसाद नार्वेकर यांचे ते वडील होत.

