कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

सावंतवाडी

१ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर हा आहे. या कालावधीत सर्व नव मतदारांनी नमुना नंबर ६ मध्ये मयत, स्थलांतरीत, दुबार मतदारांचे नमुना नंबर ७ मध्ये, मतदारयादीतील नोंदी अद्ययावत करण्यासाठी नमुना नंबर ८ – Correction व विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा विधानसभा मतदार संघाबाहेर स्थलांतरासाठी नमुना नंबर ८-Shifted या नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने NVSP या वेबसाईटवर किंवा Voter help Line या मोबाईल ॲपद्वारे अर्ज सादर करावेत. अथवा संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे गरुड ॲपमध्ये अर्ज भरणा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा. १२ व १३ नोव्हेंबर २०२२ या दोन दिवसांमध्ये सावंतवाडी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर महिला व दिव्यांग यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. २६ व २७ नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये सावंतवाडी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर तृतीयपंथीय व्यक्ती, देह विक्री करणाऱ्या महिला आणि घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे, आयोजित करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!