कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

जत्रेतील जुगारावर पोलिसांची धाड,काहीजण पळताना पडून चिखलात लोळले..

जत्रेतील जुगारावर पोलिसांची धाड,काहीजण पळताना पडून चिखलात लोळले..

उपविभागीय पोलिस अधिकारी सौ रोहिणी सोलंके यांच्या सूचनेनुसार पोलिसांची कारवाई .

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरालगत असलेल्या एका कौल देणाऱ्या गावात गुरुवारी मध्यरात्री जत्रेदरम्यान सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगारावर कारवाई करत पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. दस्तूर खुद्द सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. या वेळी जुगार खेळणारे,बघे,यांची पळताना दमछाक झाली,काही जण चिखलात पडले व अक्षरशः चिखलात लोळले. या कारवाईत अनिल सुमन नाईक (झिंगवाडी), साईद नासीर शेख (कोलगाव), दिपक न्हानु राऊळ (कोलगाव भोमवाडी), नितेश दत्ताराम म्हाडगुत (लाडाचीबाग), केतन पुरुषोत्तम देऊलकर (जुनाबाजार सावंतवाडी ) हेमंत शांताराम राऊळ (कोलगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यात काही लोकांची चिखलात घसरगुंडी होऊन काहीजण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मंदिराच्या मागील भागात हा जुगार सुरू होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जुगारावर धाड टाकली.
पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन कोयंडे, रामदास चव्हाण, सचिन सोन्सुरकर यांनी ही कारवाई केली. दरम्यान, जत्रोत्सवाच्या पहिल्या टप्प्यातच झालेल्या या जुगारावरील या कारवाईमुळे जुगारी लोकांचे धाबे दणाणले आहेत. तर स्थानिक नागरिकांमधून मात्र या कारवाईबाबत समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!