कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि९नोव्हेंबर.:*
भाजपा वैद्यकीय आघाडीच्या पाठपुराव्यामुळे व सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे व तुळस पंचक्रोशीतील ६० वृद्ध रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय , ओरस येथे केल्याबद्दल भाजपा वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डाॅ.अमेय देसाई यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सप्टेंबर महिन्यात जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे ग्रामपंचायत व तुळस आरोग्य केंद्रात भाजपाच्या सहकार्याने मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही शिबिराचा जवळ जवळ २६० ग्रामस्थांनी सहभाग घेऊन डोळ्यांची तपासणी करून घेतली होती . त्या शिबिरातील ज्या रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते , अशा रुग्णांची शस्त्रक्रिया ओरस येथे जिल्हा रुग्णालयात ऑक्टोंबर मध्ये करण्यात आली . यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील ६० लोकांची मोफत शस्त्रक्रिया शासनाच्या योजनेतून यशस्वी केली . त्यामुळे गोरगरीब जनतेला त्याचा फायदा झाला.जे रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थिती मुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करु शकत नव्हते , त्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून केल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा भाजपा च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय आघाडीचे डाॅ.अमेय देसाई यांच्या सोबत भाजपा जिल्हा चिटणीस व माजी सभापती निलेश सामंत , जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , वेंगुर्ले भाजपचे ता.उपाध्यक्ष व कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत , तुळस शक्ती केंद्र प्रमुख व तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर , युवा मोर्चा ता.सरचिटनीस नारायण कुंभार इत्यादी उपस्थित होते .

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!