🟥 अवैध दारू वाहतूकप्रकरणी ताब्यात घेतलेल्या राजस्थानमधील दोघांची जामिनावर मुक्तता
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०८:-* अवैध दारू वाहतूकप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या राजस्थानमधील दोघांची आज न्यायालयाने पंचवीस हजाराच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. कृष्णकुमार चतराराम राजपुरोहित व सत्तार मिठा खानवळ अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई २९ ऑक्टोबरला मुंबई-गोवा महामार्गावर झराप येथे करण्यात आली होती. तब्बल ५२ लाख ५६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. संशयितांतर्फे अॅड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.

