कनेडी बाजारातील कचरा नदीजवळ
कनेडी बाजारातील कचरा नदीजवळ
आरोग्य धोक्यात; स्थानिकांकडून भीती व्यक्त
कनेडी
येथील बाजारपेठे लगतच्या मल्हारी नदीपात्रात प्लास्टिकसह कचरा टाकला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या नदीपात्राच्या खालच्या भागात नळपाणी योजनाच्या उद्भव विहिरी आहेत. या विहिरीतील पाणी परिसरातील गावामध्ये नळपाणी पुरवठा योजनेतून सोडले जात असल्याने भीती व्यक्त होत आहे.
नदीचे पात्र आहे. बारमाही वाहणाऱ्या या नदीपात्रावर पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणीपुरवठा होते. नदीपात्रात मासेमारी केली जाते; मात्र, बाजारपेठेतील व्यावसायिक आणि रहिवाशी घरातील कचरा थेटपणे नदीपात्रालगत टाकतात. जागोजागी प्लास्टिक, अन्य कचरा पडल्याचा दिसतो. मोकाट जनावरे अशा कचऱ्यावर ताव मारतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या आरोग्यालाही हा कनेडी बाजारपेठेलगत मल्हारी कचरा धोकादायक ठरत आहे.

