कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

कीनारपट्टीवर कळीचा मुद्दा ठरणारा “सीआरझेड” वगळता येवू शकतो का कींवा त्यात शिथिलता आणू शकतो का याबाबत मुंबईत बैठक घेवून केंद्राकडे पाठपुरावा करेन-राहुल नार्वेकर

*🟥कीनारपट्टीवर कळीचा मुद्दा ठरणारा “सीआरझेड” वगळता येवू शकतो का कींवा त्यात शिथिलता आणू शकतो का याबाबत मुंबईत बैठक घेवून केंद्राकडे पाठपुरावा करेन-राहुल नार्वेकर*

*🟥विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सावंतवाडीत घोषणा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी , दि.६नोव्हेंबर*
गोव्या प्रमाणे सिंधुदूर्गचा
विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यटन जिल्हा डोळ्यासमोर ठेवून खासबाब म्हणून कोकण कीनारपट्टीवर कळीचा मुद्दा ठरणारा “सीआरझेड” वगळता येवू शकतो का कींवा त्यात शिथिलता आणू शकतो का याबाबत मुंबईत बैठक घेवून केंद्राकडे पाठपुरावा करेन, असा विश्वास आज येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला. दरम्यान हा निर्णय झाल्यास त्याचा फायदा अखंड सिंधुदूर्ग कीनारपट्टीला होणार आहे. या ठीकाणचे पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठी लवकरच पर्यटन मंत्र्यांना या ठीकाणी आणून वस्तूस्थिती दाखवून देवू आणि सत्कारात्मक निर्णय घेवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. नार्वेकर हे आज आपल्या खासगी दौऱ्यासाठी विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या आणि पर्यायाने सावंतवाडी वेगुर्ल्याच्या
विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, विभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहीणी सोळंके, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मुख्याधिकारी जयंत जावडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी या ठीकाणी गोव्याच्या तुलनेत सिंधुदूर्गचा विकास करू, असे त्यांनी म्हटले. हाच धागा पकडुन या ठीकाणी सीआरझेडचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे गोव्या सारखे समुद्र कीनारी पर्यटन होत नाही. याकडे त्याचे लक्ष वेधण्यात आले. मात्र केद्राकडुन सीआरझेड बाबत निर्णय होतो. मुंबई वगळता कोकण पट्याच्या अन्य झोन मध्ये समावेश केला आहे, असे यावेळी नार्वेकर यांनी सांगितले. मात्र सिंधुदूर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून लक्ष घालण्यात यावे, अशी मागणी यावेळी उपस्थित पत्रकारांच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी मांडलेली संकल्पना त्यांना आवडली. त्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रीया दिली. आपण मांडलेली भूमिका महत्वाची आहे. विशेष बाब म्हणून याठीकाणी सीआरझेडच्या कायद्यात शिथीलता आणता येवू शकते. मात्र त्यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करूया, त्यासाठी पर्यटन मंत्र्याना याठीकाणी जानेवारीत आपण आणून पुढील आराखडा तयार करू, आणि याबाबत काही सकारात्मक निर्णय घेता येतो का ? यासाठी केद्रस्तरावर पाठपुरावा करू, असे ते म्हणाले
_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*

_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._

_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_

*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*

*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*
*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*

*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*

*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*

_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_

*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*

*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*

_🚶‍♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_

*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी

*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!