वेंगुर्ले शहरातील किल्ले ठरत आहेत लक्षवेधी
वेंगुर्ले शहरातील किल्ले ठरत आहेत लक्षवेधी
प्रतिनिधी -: वेंगुर्ले
दिवाळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी बनविलेले किल्ले लक्षवेधी ठरत आहेत. राऊळवाडा येथील शिवतेज बाल मित्रमंडळाने बनविलेला किल्ला आकर्षक आहे. परिसरातील नागरिक हा किल्ला पाहण्यासाठी हजेरी लावत असून, मुलांचे कौतुक करीत आहेत. हा किल्ला बनविण्यासाठी अर्जुन देवासी, नचिकेत माडये, नंदिता परब, रणवीरसिंह रावळ, श्रवणकुमार देवासी, नंदीत परब या मुलांनी परिश्रम घेतले. शिवतेज बाल मित्रमंडळाने किल्ला बनवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिला.

