कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

दर्जेदार शिक्षण हेच ‘कनेडी’चे उद्दिष्ट-संस्थेच्या अध्यक्ष पदी सतीश सावंत, बिनविरोध.

दर्जेदार शिक्षण हेच ‘कनेडी’चे उद्दिष्ट

सतीश सावंत : संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

प्रतिनिधी -: कणकवली

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई सस्थेची सलग चोथी निवडणूक बिनविरोध झाली असून, संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची बिनविरोध निवड झाली. दर्जेदार शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण हे संस्थेचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन सावंत यांनी यावेळी केले.

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच मुंबई येथे घेण्यात आली होती. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी मुंबई येथे झाली. तत्पूर्वी संस्थेच्या माध्यमातून पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया राबविली होती. या निवडणुकीमध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी सावंत, उपाध्यक्षपदी प्रभाकर सावंत, सरचिटणीस शिवाजी सावंत तर
खजिनदारपदी प्रकाश सावंत यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यकारणी संचालक म्हणून डॉ. प्रदीप सावंत, सुधीर सावंत, संजय लवु सावंत, रत्नाकर सावंत, संजय दामोदर सावंत, संदेश सावंत, नागेश सावंत, दत्तात्रय सावंत, जयप्रकाश सावंत, जयवंत सावंत, व्ही. बी. सावंत यांची निवड झाली. संस्थेच्या कायदेशिर सल्लागार सदस्यपदी अॅड. जगदीश सावंत, अॅड. मिलिंद मोहन सावंत, अॅड. सोनल सावंत परब, अंतर्गत हिशेब तपासणीस रविंदर पुंडलिक सावंत आणि गितेश वळंजू, सल्लागार सदस्य विलास भास्कर सावंत यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!