कारिवडेतील आशाताई नीलिमा सावंत यांना ब्लड कँसरचा दुर्धर आजार..
▪️आई आजारातून पूर्णपणे बरी होण्यासाठी दात्यांना भरघोस मदतीचे मुलगे निखील व नीरज यांचे आवाहन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०९: कारिवडे-गावठणवाडी येथील सौ. नीलिमा नितीन सावंत या विवाहितेला ब्लड कँसर या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. दोन लहान मुलांसह आजारी पतीची सर्वतोपरी जबाबदारी असलेल्या गरीब कुटुंबातील महिलेला ब्लड कँसर झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा आजार प्राथमिक स्टेजला असून त्यांच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे.
सौ. निलीमा सावंत या पूर्वाश्रमीच्या मडूरे येथील विद्या परब. सासरसह माहेरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताचीच आहे. निलीमा या आशाताई म्हणून काम करतात. त्यावरच त्या आपला प्रपंच चालवितात. पती नितीन सावंत हे आजारी असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. मुलांचे शिक्षण, औषध खर्चासह सर्व प्रापंचिक भार त्या हसतमुखाने सांभाळत आल्या आहेत.
सौ. निलीमा या पती व दोन लहान मुलांसह कारिवडेत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत बिघडत असल्याने त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता त्यांना ब्लड कँसर असल्याचे सिद्ध झाले. यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यांचा कँसर प्राथमिक स्टेजला असून लवकरात लवकर उपचार झाल्यास त्या या आजारातून बर्या होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी किमान ६ लाख रुपयांचा खर्च असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांच्यासह माहेरची आर्थिक स्थितीही खूपच बेताची असल्याने उपचार करणे अशक्य आहे. यासाठी सावंत कुटुंबियांनी सर्व जनतेकडे मदतीची याचना केली आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे आपली छोटी आर्थिक मदतही या माऊलीचा जीव वाचविण्यासाठी उपयुक्त ठरु शकते.
आमची आई या आजारातून पूर्णपणे बरी होण्यासाठी दात्यांनी भरघोस मदत करावी असे आवाहन मुलगे निखील व नीरज सावंत यांनी केले आहे.
त्यासाठी निलिमा नितीन सावंत, बँक आँफ इंडिया-शाखा सावंतवाडी, खाते क्र. १४१०१०११०००२३३२, आयएसएससी कोड BKID0001410 या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा करावी.
अधिक माहितीसाठी ९५६१६६९९९५ (सुनील परब) व ९४०५४५१३९२ (भूषण परब) यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन सावंत कुटुंबियांनी केले आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

