आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

माडखोल येथील सगुण राऊळ या एकोणीस वर्षिय युवकाचा बुडून मृत्यू

सावंतवाडी, ता.२८: सातुळी-ब – बावळाट येथील नदीत पोहण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. साहिल उर्फ सगुण जनार्दन राऊळ असे त्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती पण मृतदेह पाण्याच्या बाहेर आला नाही. त्यामुळे बाबल अल्मेडा पथकाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबतची माहिती मिळतात सावंतवाडी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली आहे अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!