कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

राधारंग फाऊंडेशन’ तर्फे मळगांव येथील महिलांसाठी 2 कॅरम बोर्ड प्रदान

राधारंग फाऊंडेशन’ तर्फे मळगांव येथील महिलांसाठी 2 कॅरम बोर्ड प्रदान

राधारंगचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियाच्यावतीने वाचनालयाला भेट

सावंतवाडी(सुखदेव राऊळ)

महिलांच्या अंगातील सुप्त क्रीडा गुणांना मार्ग करून देण्यासाठी येथील ‘राधारंग फाऊंडेशन’ ने मळगांव येथील महिलांसाठी 2 कॅरम बोर्ड प्रदान केले आहेत.या बोर्डचे उदघाटन नुकतेच येथील सखी महिला भिशीच्या महिला सदस्य व गावातील महिला यांच्या हस्ते वाचनालयाच्या सभागृहात पार पडले.
या उदघाटन कार्यक्रमास नरेश खानोलकर,संतोष सरनाईक, डॉ.अरविंद खानोलकर,वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर,सचिव गुरूनाथ नार्वेकर,संचालक स्नेहा खानोलकर,कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
हे कॅरम बोर्ड ‘राधारंग ची भाऊबीज’ या संकल्पनेतून कै. उदय खानोलकर वाचनमंदिर च्या ताब्यात दिले आहेत.हे कॅरम बोर्ड राधारंगचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियाच्यावतीने वाचनालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!