शिरूरच्या शूटिंग क्लबचे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत घवघवीत यश
*शिरूरच्या शूटिंग क्लबचे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत घवघवीत यश*
पूणे-
*आसनसोल (पश्चिम बंगाल)* येथे नुकत्याच पार पडलेल्या ३१वी जी. व्ही. मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये व
*महू, इंदोर(म.प्र.)* येथे ९वी वेस्ट झोन शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये शिरूरच्या श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमधील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या ११ नेमबाजांची १० मीटर पिपसाईट एअर रायफल या प्रकारात राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली.
केतन गोविंद जेधे याने ४०० पैकी ३८९ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावले. तसेच
स्नेहा शशिकांत नांदोडे(३८५),
श्रावणी संतोष वाळके(३७२),
प्रणित सुभाष दसगुडे (३८३),
ऋतुजा बाबासाहेब ठुबे(३८१),
तेजस राजकुमार भोसले (३७३),
शार्दूल शिवाजी उगले(३७२),
मयूर विश्वास दंडवते (३७१),
आयुष अरुण मुठाळ (३७०),
जयेश कल्पेश आगलावे (३७०)
सेजल शरद जगदाळे(३६६),
गुणांची कमाई करत त्यांची *२० नोव्हेंबर ते ०९ डिसेंबर दरम्यान तिरुनंतपुरम, केरळ येथे होणाऱ्या ६५वी नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन* या स्पर्धेसाठी निवड झाली.
सर्व नेमबाज *शिरूरच्या युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब मध्ये प्रशिक्षक श्री. शरद तरटे* यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.
संस्थेमधील प्राचार्य श्री बाहेती सर, श्री शहा सर, श्री पोटे सर, श्री गिरमे सर, साठे मॅडम तसेच श्री पडवळ सर व सर्व प्रशिक्षक वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी थिटे व उपाध्यक्ष श्री धनंजय जी थिटे यांनी सर्व नेमबाजांचे कौतुक करत पुढील होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

