अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी राजेंद्र दभाडेच
*अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी राजेंद्र दभाडेच*
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पवन बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले होते. परंतु पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार तूर्तास या बदलीच्या आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा पदभार पुढील आदेश मिळेपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडेच राहणार आहे.

