आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

माडखोल डुंगेवाडी येथील मेघश्याम गावडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

माडखोल डुंगेवाडी येथील मेघश्याम गावडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भातशेतीत भात झोडणीचे काम करीत असताना मेघशाम रामा गावडे (५३) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याची माडखोल डुंगेवाडी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. मेघशाम गावडे हे कोल्हापूर येथील हॉटेलमध्ये कामाला असतात. शेतीच्या कामासाठी ते गावाकडे येतात. सायंकाळी शेतात ते कापलेले भात झोडत असतानाच अचानक जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यांच्या आकस्मित निधनाने गावडे कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माडखोल गावात शोककळा पसरली. रात्री उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अक्षय गावडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आई, चार भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!