माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या इशाऱ्यानंतर सावंतवाडीत मटका, जुगार बंद,पोलिसांची करडी नजर.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या इशाऱ्यानंतर सावंतवाडीत मटका, जुगार बंद,पोलिसांची करडी नजर.
सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी शहरातील जुगार, मटका, बाबत आंदोलनाची भूमिका घेऊन पोलीस प्रशासनावर आरोप केल्यावर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून शहरातील मटका ,जुगार, पूर्णपणे बंद झाले आहेत, तर यावर पोलीस गस्त घालून करडी नजर ठेवत असल्यामुळे या धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
सावंतवाडी सारख्या शांत व सुसंस्कृत शहरात अवैध धंद्यांना खतपाणी घातले जाऊ नये न यासाठी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी उठाव केला होता,याची दखल घेत सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोलंके यांनी शहरातील तसेच आसपासच्या गावातील अवैध धंद्यांवर टाच आणली असून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत ,त्यामुळे असे धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी गोवा राज्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या विषारी चोरटी दारू विरुद्ध व गांजा,चरस, याच्या विरुद्ध आवाज उठवावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

