कोकणसिंधुदुर्ग

स्ट्रीट लाईट म्हणजे ग्रामीण भागातील उजेडाचे एक महत्त्वाचे साधन.

 

जिल्हा परिषद माजी सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी केले प्रतिपादन.

 

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस

 

गेल्या पाच वर्षात मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली. रस्ते व स्ट्रीट लाईट ही प्रत्येक गावातील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेत प्रामुख्याने त्यावर अधिक भर दिला अन आज दांडेली खोतवाडी, कोंडुरा तिठा परिसर उजेडात आणला. स्ट्रीट लाइट म्हणजे ग्रामीण भागातील उजेडाचे एक महत्त्वाचे साधन असल्याचे प्रतिपादन, जिल्हा परिषद माजी सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी केले.

जिल्हा परिषद स्वनिधीतून दांडेली खोतवाडी, कोंडुरा तिठा परिसरात स्ट्रीट लाइट कार्यन्वित करण्यात आली असून त्याचे उद्घाटन राजू मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.स.माजी उपसभापती संदीप नेमळेकर, आरोस सरपंच शंकर नाईक, न्हावेली माजी सरपंच शरद धाउसकर, दांडेली माजी सरपंच बाळा मोरजकर, माजी उपसरपंच योगेश नाईक, माजी ग्रा.पं.सदस्य तानाजी खोत, आरोस ग्रा.पं.सदस्य प्रसाद नाईक, मळेवाड ग्रा.पं.सदस्य अर्जुन मुळीक तसेच रवींद्र मुळीक, संभाजी मुळीक, सुमंत मुळीक, प्रीतेश मुळीक, सुधीर मुळीक, बंटी खोत, दिनेश खोत, उमेश खोत,किरण खोत,शैलेश खोत,चिंतामणी खोत,सुनील खोत,दिनकर तेली,दिनेश बोंद्रे,रामदास पांगम,आपा पालयेकर, विकास शेगडे, गणेश खोत, दत्ता शेगडे, हेमंत मुळीक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी खोत यांनी केले तर आभार योगेश नाईक यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!