🟥 समाजात सुदृढ सामाजिक आरोग्याची नितांत गरज ; जेष्ठ मानसोपचारतज्ज्ञ – मीनाक्षी
🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१२:-* “बदलत्या आधुनिक जगात माणसांचे प्रश्न बदलत आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य आनंददायी असणे काळाची गरज आहे. बदलती जीवनशैली माणसाला आपले वर्तन, भावना बदलायला भाग पडते आहे. मनाचं शास्त्र जाणून आजच्या काळाला आजच्या माणसाने सामोरे जाण्याची नितांत गरज आहे. काळाचे पडसाद तुम्हाला ऐकावे लागतील. आपल्या मनातले प्रश्न आपणच कसे सोडवता येतील त्यादृष्टीने जगण्याची शैली बदलायला हवी” असे प्रतिपादन जेष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व ‘सहज ट्रस्ट’, गाळेल, बांदाच्या अध्यक्षा ,मीनाक्षी यांनी येथे केले.
येथील गोगटे वाळके कॉलेज, बांदाच्या महिला विकास कक्ष यांच्यावतीने आयोजित केलेल्या “सामाजिक मानसिक आरोग्य” या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.एन.डी. कार्वेकर हे होते.
यावेळी मीनाक्षी यांनी मानसिक आरोग्याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर मांडणी केली. त्या पुढे म्हणाल्या की, “ मानसिक वर्तनात त्या-त्या कुटुंबाचा, समाजाचा मोठा वाटा असतो. नैराश्य झटकून नव्या उमेदीने सकारात्मक कार्य करण्याची आवश्यकता प्रत्येक माणसाला हवी. जगण्याचे प्रश्न जरी बदलले तरी मानवी मुल्यांची जोपासना करणे व वृद्धिंगत करणे ही काळाची गरज ठरते आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महिला विकासकक्षाच्या समन्वयक प्रा. सौ.रश्मी काजरेकर यांनी केले. यावेळी काजरेकर म्हणाल्या कि, “ महिलांच्या उन्नतीसाठी हा महिला विकास कक्ष आहे. विविध उपक्रमातून विद्यार्थीनीना प्रत्येक गोष्टीत सजग करण्याचे कार्य हा विभाग करतो. सामाजिक प्रश्नांना हाताळण्याचा कसोशीने हा विभाग प्रयत्न करत असतो.”
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.एन.डी. कार्वेकर म्हणाले की,“सामाजिक मानसिक आरोग्य सुदृढ राहणे ही त्या-त्या समाजाची खरी संपत्ती आहे. हे सुदृढपण समाजाला निकोप बनविते. आनंददायी समाजाची निर्मिती यासाठी हे सामाजिक आरोग्य टिकले पाहिजे.”
कार्यक्रमाचे आभार महिला विकासकक्षाच्या सदस्या सौ. सुप्रिया नातू-आपटे यांनी व्यक्त केले व सूत्रसंचालन प्रा.अनिल शिर्के यांनी केले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*
🏹🏹💻 *लॅपटॉप* 💻🪔🪔
🎊🇫 🇪 🇸 🇹 🇮 🇻 🇦 🇱
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🪔🪔🪔
*गेली 20 वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टिब्रँड लॅपटॉप विक्रेते 🔺आस्था कॉम्पुटर शॉपि*🔺 सावंतवाडी यांच्या कडून सादर आहे
*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹* या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर *0% व्याज दरात BAJAJ फायनान्स*
तसेच
🏹👺🏹 *दसरा ते दिवाळी*🪔🪔 *दरम्यान केलेल्या*
🎁 *लॅपटॉप खरेदी वर 12 ते 15 हजार च्या Festival ऑफर्स*🎁 कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022
➖➖➖➖➖➖➖➖➖
💵 *मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार 😱ची सूट*(निवडक मॉडेल)
⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🎧 *2000/- ते 3200/- चे Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा 🎷🔊 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🖱️⌨️ *2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *650/- किं. चा वायरलेस mouse*
🎒 *1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag*
👉 _(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)_
🖨️🖨️🟣🟡🔵🟢⚫🖨️🖨️
*या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट*
उदा. 👉🏼 HP INK Tank Printer
Market Price ~14,190/-~ चा प्रिंटर फक्त *10,???/-*
💵💶💵💶💵💶💵💶💵
*आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*🏡आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली*
*एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी*
☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 8830256755*
🖥️🖥️🖥️🪔🪔🪔🪔🪔

