सांगेली गुरगुटवाडी येथील तरुणाचा वीज पडून मृत्यू
सांगेली गुरगुटवाडी येथील तरुणाचा वीज पडून मृत्यू.
सांगेली
परतीच्या पावसात विजेच्या कडकडाटासह आज पहाटे सह्याद्री पट्ट्यातील सांगेली गुरगुटवाडी येथील २९ वर्षीय तरुण हनुमंत नाना झोरे यांच्या अंगावर आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाला. आज पहाटे बहुतांश भागात पहाटेपासूनच विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला होता . झोरे लघुशंकेसाठी घराच्या अंगणात गेले असता अचानक त्यांच्या अंगावर विजेचा लोळ पडून ते जागीच ठार झाले. तो घरात पुन्हा परतला नाही म्हणून त्याच्या घरातील आई-वडिलांनी व कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहतात तर तो अंगणात विजेचा लोळ पडून पडला होता. लागलीच गावातील व्यक्तीने याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कळवताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. हनुमंत झोरे हे अविवाहित होते.शेतीचे कामे व मेंढ्या पालन हा त्यांचा व्यवसाय होता सावंतवाडी तालुक्यात परतीच्या पावसाने वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असून सावंतवाडी तहसीलद श्रीधर पाटील यांनी ही कुटुंबीयांची विचारपूस केली .

