माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते साईनाथ प्रभाकर आंबेरकर यांचा गौरव पत्र देऊन सत्कार
*माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते साईनाथ प्रभाकर आंबेरकर यांचा गौरव पत्र देऊन सत्कार*
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग*
कोव्हीड-१९ काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डाॅक्टर रक्तदाते,सामाजिक कार्यकर्ते, यांचा सत्कार समारंभ अठल प्रतिष्ठान,किरात,माझा वेंगुर्ले या संस्थांच्या माध्यमातून नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह,वेंगुर्लो येथे आयोजित करण्यात आला होता.माझ्या कसाल पंचक्रोशी आणी सिद्धिविनायक मित्र मंडळ,सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेऊन माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभु याच्या हस्ते गौरवपत्र देउन साईनाथ प्रभाकर आंबेरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना साईनाथ आंबेरकर यांनी हा सन्मान सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानच्या माझ्या सर्व सहकारी सन्माननीय मित्रांचा माझ्या सिद्धिविनायक मित्र मंडळ आणी माझ्या कसाल पंचक्रोशीतील सर्व रक्तमित्रांचा आहे.
माझा वेंगुर्ला,किरात,अठल प्रतिष्ठान या संस्थेंचा मी अत्यंत ऋणी आहे.
असा हा सन्मानाचा दिवस सामाजिक क्षेत्रात निस्वार्थीपणे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नशीबात येवो.
सिंधुदुर्ग जिल्हात रक्तदानासारख्या क्षेष्ठकार्यात माझी व माझ्या सिद्धिविनायक मित्र मंडळाची नावलौकिकता केल्या बद्दल सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग या संस्थेचे मनापासून आभार मानले आहेत.

